आज राज्यसभेतील ४ सदस्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. आपल्या विरोधी पक्षातील सदस्य तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. गुलाब नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.